पत्रकारांना मारहाण; माजी मुख्यमंत्री अडचणीत

अखिलेश यादव यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हालखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांना पत्रकारांना मारहाणीच प्रकरण चांगलेच अंगलट आले असून याप्रकरणी त्यांच्यासह २१ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की,११ मार्च रोजी अखिलेश यादव यांनी मुरादाबाद येथे एक रिसॉर्टवर पत्रकार परिषद घेतली होती. …
 

अखिलेश यादव यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा
लखनौ :
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांना पत्रकारांना मारहाणीच प्रकरण चांगलेच अंगलट आले असून याप्रकरणी त्यांच्यासह २१ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की,११ मार्च रोजी अखिलेश यादव यांनी मुरादाबाद येथे एक रिसॉर्टवर पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर लॉबीमध्ये त्यांना काही पत्रकारांनी व्यक्तिगत प्रश्न विचारले. त्यावर भडकलेल्या अखिलेश यांनी त्यांच्या गार्डसना व समर्थकांना चिथावणी देऊन काही पत्रकारांना जबर मारहाण केली. यात अनेक पत्रकार गंभीर जखमी झाले. वृत्तवाहिन्यांचे काही रिपोर्टर खाली पडल्याने जखमी झाले. त्यासंदर्भात अखिलेश व अन्य २१ जणांविरोधात मुरादाबाद क्षेत्रातील पाकबडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे सपाच्या जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरून १८ पत्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.