पतीसाठी दरवाजा उघडा ठेवला, पण शेजारीच घरात घुसला… विवाहित तरुणीवर बलात्कार
नोएडा (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीसाठी दरवाजा उघडा ठेवला, पण शेजाऱ्यानेच घरात घुसून विवाहित तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्धनगर (नोएडा)च्या भंगेल परिसरात आज समोर आली आहे. तरुणीचा पती झोपण्यासाठी छतावर गेला होता. तो रात्री घरी येईल म्हणून तिने दरवाजा उघडताच ठेवला होता. ही संधी साधून शेजारी राहणाऱ्या रिंकू नावाच्या तरुणाने घरात शिरून …
Jun 8, 2021, 14:09 IST
नोएडा (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीसाठी दरवाजा उघडा ठेवला, पण शेजाऱ्यानेच घरात घुसून विवाहित तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्धनगर (नोएडा)च्या भंगेल परिसरात आज समोर आली आहे.
तरुणीचा पती झोपण्यासाठी छतावर गेला होता. तो रात्री घरी येईल म्हणून तिने दरवाजा उघडताच ठेवला होता. ही संधी साधून शेजारी राहणाऱ्या रिंकू नावाच्या तरुणाने घरात शिरून तिला घाबरवून बलात्कार केला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिंकूला अटक केली आहे.