न्‍यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड!

नवी दिल्ली ः दामिनी चित्रपटातील सनी देओलचा “तारीक पे तारीक’चा संवाद अनेकांना आठवत असेल. वास्तवातही “तारीक पे तारीक’ मिळत असल्याने देशात लाखो खटले न्यायाची वाट पाहत आहेत. न्यायासाठी वर्षानुवर्षे लढत देणाऱ्या, वारंवार दिल्या जाणाऱ्या तारखांना हजर राहूनही पदरी काहीच पडत नसल्यानं मग संताप अनावर होतो. न्यायासाठी लढणाराच कायदा हातात घेतो. असंच उदाहरण दिल्लीत घडलं. तारखांमागून …
 

नवी दिल्ली ः दामिनी चित्रपटातील सनी देओलचा “तारीक पे तारीक’चा संवाद अनेकांना आठवत असेल. वास्तवातही “तारीक पे तारीक’ मिळत असल्याने देशात लाखो खटले न्यायाची वाट पाहत आहेत. न्यायासाठी वर्षानुवर्षे लढत देणाऱ्या, वारंवार दिल्या जाणाऱ्या तारखांना हजर राहूनही पदरी काहीच पडत नसल्यानं मग संताप अनावर होतो. न्यायासाठी लढणाराच कायदा हातात घेतो. असंच उदाहरण दिल्लीत घडलं. तारखांमागून तारखा पडत जाऊन पाच वर्षे पुढं काहीच होत नसल्यानं एका व्यक्तीनं थेट न्यायालयातील फर्निचर, संगणकाची मोडतोड केली.

दिल्लीच्या जिल्हा न्यायालयात पुन्हा पुन्हा तारीख मिळाल्याने एका व्यक्तीचा संताप इतका अनावार झाला, की त्याने न्यायालयाच्या खोलीतील संगणक व फर्निचरची तोडफोड केली. तेवढ्यावर तो थांबला नाही. न्यायाधीशांच्या बसण्याच्या जागेचेही त्याने नुकसान केले. या दरम्यान तो दामिनी या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध संवाद “तारीक पे तारीक’ म्हणत होता. ही घटना करकरदूमा कोर्टाच्या कक्ष क्रमांक 66 मध्ये घडली. फिर्यादी राकेश वारंवार तारखा पडून दावा वारंवार पुढं जात असल्यानं रागावला होता. त्याचा खटला 2016 पासून प्रलंबित आहे. आता पुन्हा तारीख मिळाल्याने चित्रपटातील प्रसिद्ध संवाद त्याने जोरात म्हणायला सुरुवात केली. न्यायाधीश ऐकत नाहीत, असा त्याचा आरोप होता. त्यानंतर त्याने संगणक, फर्निचर आणि न्यायाधीशांची बसण्याची जागा तोडण्यास सुरुवात केली. खोडसाळ वागणूक, धमकी आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि त्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल राकेशला पोलिसांनी अटक केली.