नवरा निघाला “गे’! त्याच्या मोबाइलमध्ये तरुणासोबतचे आक्षेपार्ह फोटो पाहून हादरली ती!
इंदौर : लग्नानंतर नवरा समलिंगी म्हणजेच “गे’ असल्याचे पत्नीला कळाले. तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्यात बदल होईल याची तिने तब्बल पाच वर्षे वाट पाहिली. मात्र तरीही नवरा सुधारला नाही म्हणून पत्नीने पतीविरुद्ध फसवणूक व छळाची तक्रार दिली.
मध्यप्रदेशच्या इंदौर शहरात हा प्रकार समोर आला आहे. बँकेत काम करणाऱ्या महिलेचे दीपक गुप्ता या तरुणासोबत २०१५ मध्ये लग्न झाले होते. दीपकला त्याच्या पत्नीचे आकर्षण नव्हते. त्याने ५ वर्षांत साधे चुंबनही घेतले नाही. रात्री तो निवांत झोपायचा. सुरुवातीला पत्नीला दीपकच्या वागणुकीचे रहस्य कळत नव्हते. मात्र एक दिवस तिला दीपकच्या फोनमध्ये एका १९ वर्षांच्या तरुणासोबत त्याचे आक्षेपार्ह फोटो दिसले. ते फोटो पाहून ती हादरली. तिने पतीला याबाबत विचारणा केली असता मी असाच आहे, असे उत्तर दीपकने दिले. दीपक सुटीच्या दिवशी त्या तरुणासोबत वेळ घालवायचा. पत्नीसोबत त्याने कधीही वेळ घालवला नाही. रात्री उशिरापर्यंत तरुणासोबत फोनवर बोलत असायचा, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.