दोनशेंहून अधिक मुलींना “त्याने’ पाठविले अश्लील फोटो

जयपूर : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात फोटो काढीत असल्याचं सांगून, तरुणींचे नंबर घेऊन त्यावर अश्लील फोटो पाठविणाऱ्या विकृत छायाचित्रकाराच्या जयपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा छायाचित्रकार २६ वर्षांचा आहे. अमित रोहिल्ला असं त्याचं नावं. अश्लील फोटो आणि संदेश पाठवून तो मुलींना छळायचा. या माथेफिरूनं आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त मुलींना असे अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले …
 

जयपूर : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात फोटो काढीत असल्याचं सांगून, तरुणींचे नंबर घेऊन त्यावर अश्लील फोटो पाठविणाऱ्या विकृत छायाचित्रकाराच्या जयपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

हा छायाचित्रकार २६ वर्षांचा आहे. अमित रोहिल्ला असं त्याचं नावं. अश्लील फोटो आणि संदेश पाठवून तो मुलींना छळायचा. या माथेफिरूनं आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त मुलींना असे अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले आहेत. तो मूळचा झुंझुनू येथील आहे. जयपूर येथील बालाजी विहारमध्ये तो भाड्याच्या घरात राहतो. गेल्या आठवड्यात एका मुलीने या युवकाविरोधात फिर्याद दिली. 11 डिसेंबर 2020 रोजी अज्ञात व्यक्तीनं तिला काही अश्लील मेसेज सोशल मीडियावर पाठवले होते. याबाबत तिनं आपल्या कुटुंबीयांना सांगितलं, आरोपीला मुलीच्या कुटुंबानं बोलावले असता त्यानं उलट शिवीगाळ करायला सुरुवात केली आहे. मुलीच्या कुटुंबानं समजावून सांगितल्यानंतरदेखील हा विकृत फोटोग्राफर मुलीला अश्लील संदेश पाठवित होता. तेवढ्यावर तो थांबला नाही, तर या मुलीला फोन करून त्रास दिला आणि तिच्यावर भेटण्यासाठी दबाव आणला. अखेर त्रस्त मुलीनं पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी त्याला गजाआड केलं.