तुम्ही सक्षम नाही, तुम्हाला देश चालवता येत नाही

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर कठोर ताशेरे इस्लामाबाद : पाकिस्तानला विदेशी कर्ज आणि महागाईच्या खोल गर्तेत लोटणार्या पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. तुम्ही देश चालवण्यास अक्षम आहात.तुम्हाला देश चालवता येत नाही. देश काय अशा पद्धतीने चालतो काय? असा सवालही न्यायालयाने विचारला आहे. महागाईच्या मुद्यावर अगोदरच …
 

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर कठोर ताशेरे

इस्लामाबाद : पाकिस्तानला विदेशी कर्ज आणि महागाईच्या खोल गर्तेत लोटणार्‍या पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. तुम्ही देश चालवण्यास अक्षम आहात.तुम्हाला देश चालवता येत नाही. देश काय अशा पद्धतीने चालतो काय? असा सवालही न्यायालयाने विचारला आहे. महागाईच्या मुद्यावर अगोदरच विरोधकांनी कोंडीत पकडल्या गेलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत यामुळे वाढ झाली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवा भारत घडविण्याची घोषणा दिल्यानंतर इम्रान खान यांनी ‘नया पाकिस्तान‘ अशी घोषणा दिली होती. पण चीनचा वाढता प्रभाव,दहशतवादाच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने केलेली पाकची कोंडी,वाढती कोरोना साथ, महागाई आदी मुद्यांवर इम्रान खान यांच्याविरोधात नाराजी असून तीव्र आंदोलने केली जात आहेत. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने गेल्या दोन महिन्यांपासून कॉमन इंटरेस्ट कौन्सिलची (सीसीआय) बैठक न घेतल्याप्रकरणी इम्रान खान सरकारला चांगलेच फटकारले आहे. इम्रान खान यांनी यंदा होणारी राष्ट्रीय जनगणनाही लांबणीवर टाकली आहे. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून सीसीआयची बैठक बोलावली नाही.या दोन मुद्यांवर सरकारला धारेवर धरले. केंद्र व राज्यांमधील दुवा असलेल्या सीसीआयची बैठक न बोलावणे हे सरकारच्या अपात्रतेचे लक्षण आहे, असे मत न्यायमूर्ती काझी पैâज इशा यांच्यासह दोन सदस्यीय पीठाने व्यक्त केले. या दोन्ही मुद्यांवर कोर्ट गंभीर दिसले. इम्रान सरकारला तुम्ही देश चालवण्यास व निर्णय घेण्यास सक्षम दिसत नाही, असे बजावले आहे.