केंद्राचा लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा!; घरातील सदस्याला कोरोना झाल्यास 15 दिवसांची विशेष सुटी

नवी दिल्ली (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा)ः घरातील सदस्याला कोरोना झाल्यास केंद्र सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला 15 दिवसांची स्पेशल कॅज्युअल लिव्ह अर्थात सुटी दिली जाणार आहे. तसा आदेश पर्सनल मिनिस्ट्रीने काढला आहे. हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज भासल्यास ही सुटी आणखी वाढवता येऊ शकते. अगदी कुटुंबियांना डिस्चार्ज मिळेपर्यंत ते सुटीवर राहू शकतात. कर्मचारी स्वतः बाधित झाला तर 20 दिवसांची …
 

नवी दिल्ली (लाइव्‍ह ग्रुप वृत्तसेवा)ः घरातील सदस्याला कोरोना झाल्यास केंद्र सरकारच्‍या कोणत्‍याही कर्मचाऱ्याला 15 दिवसांची स्‍पेशल कॅज्‍युअल लिव्ह अर्थात सुटी दिली जाणार आहे. तसा आदेश पर्सनल मिनिस्‍ट्रीने काढला आहे.

हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज भासल्यास ही सुटी आणखी वाढवता येऊ शकते. अगदी कुटुंबियांना डिस्‍चार्ज मिळेपर्यंत ते सुटीवर राहू शकतात. कर्मचारी स्वतः बाधित झाला तर 20 दिवसांची सुटी मिळेल. ही सुटी त्‍याला होम आयसोलेशन किंवा क्‍वारंटाईन राहण्यासाठी वापरता येईल. मात्र यासाठी त्‍याला पुरावे द्यावे लागणार आहेत. एखादा कर्मचारी एखाद्या बाधिताच्‍या संपर्कात आला आणि त्‍याला होम आयसोलेशनमध्ये राहावे लागले तर सुरुवातीचे 7 दिवस ऑन ड्युटी मानले जाईल.