एक फुल दो माली… पण फुल तिसऱ्याच्‍या पाशात… दोघांनीही केली आत्‍महत्‍या

कोटा (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा)ः एक फुल, दो माली अशी चित्रपट कथेत रंगणारी प्रेमकहाणी आपण अनेकदा पाहिली आहे. फिल्मी कहाण्यांमध्ये शेवटी दोघांपैकी एका प्रेमविराचा विजय ठरलेलाच. परंतु राजस्थानमध्ये प्रत्यक्षात घडलेली घटना वेगळी आहे. एकाच तरुणीवर दोन भावंडांचे प्रेम जुळले. मात्र दोघांच्या हाती मुलगी लागत नसल्याने अखेर दोघांनीही टोकाचे पाऊल उचलत धावत्या रेल्येसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. …
 

कोटा (महाराष्ट्र न्‍यूज लाइव्‍ह वृत्तसेवा)ः एक फुल, दो माली अशी चित्रपट कथेत रंगणारी प्रेमकहाणी आपण अनेकदा पाहिली आहे. फिल्मी कहाण्यांमध्ये शेवटी दोघांपैकी एका प्रेमविराचा विजय ठरलेलाच.  परंतु राजस्थानमध्ये प्रत्यक्षात घडलेली घटना वेगळी आहे. एकाच तरुणीवर दोन भावंडांचे प्रेम जुळले. मात्र दोघांच्‍या हाती मुलगी लागत नसल्याने अखेर दोघांनीही टोकाचे पाऊल उचलत धावत्या रेल्येसमोर उडी घेऊन आत्महत्‍या केली. आत्महत्‍येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवून मुलीला योग्य जोडीदार शोधण्याचा सल्लाही दिला हे विशेष.

देवराज गुर्जर (२३) आणि महेंद्र गुर्जर (२३) अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत. राजस्थानमधील केशवपुरा (जिल्हा बुंदी) येथील हे दोघे भावंडे रहिवासी आहेत. दोघांचेही एकाच तरुणीवर प्रेम होते. आपल्या प्रेमात चुलतभाऊच वाटेकरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यातून कोणताही मार्ग निघत नसल्याने मागील काही दिवसांपासून दोघेही तणावात होते. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला एक व्हिडिओ तयार केला. यात त्यांनी आमच्यावर कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. मुलीसाठी योग्‍य जोडीदार शोधा, तिचं लग्न लावून द्या, असा उल्लेखही त्यांनी या व्हिडिओत केला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.