आश्चर्यजनक बातमी ः दहशतवादाचा हा काय भलताच प्रकार… महिलांना केले जातेय टार्गेट!
लंडन ः हातात बंदूक अन् तोंडाला रुमाल, स्कार्फ बांधलेले दहशतवादी अशी दहशतवाद्यांची प्रतिमा सर्वांसमोर आहे. मात्र दक्षिण कोरियामध्ये सध्या एक वेगळाच दहशतवाद फोफावत असल्याचे तिथल्या महिलांचे म्हणणे आहे. तिथल्या कायद्यात संशोधन करून हा नवीन दहशतवाद गंभीर गुन्हा मानला जावा, असे महिलांचे म्हणणे आहे. अलीकडच्या काळात महिलांना अपमानित करण्यासाठी पुरुषांनी चक्क विर्याचा वापर केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
एका व्यक्तीने महिलेच्या बुटावर वीर्य टाकून बूट खराब केला. तेव्हा या व्यक्तीला ४३५ डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. याप्रकरणात प्रॉपर्टी डॅमेजचा दंड लावण्यात आला होता. कारण असा गुन्हा लैंगिक गुन्हा नाही, असं न्यायव्यवस्थेचं मत होतं. दुसऱ्या एका घटनेत एका व्यक्तीने महिलेच्या कॉफीत वीर्य टाकले होते. त्या व्यक्तीला तीन वर्षांची शिक्षा झाली. मात्र या गुन्ह्याकडे लैंगिक गुन्हा म्हणून पाहण्यात आले नव्हते. एका सरकारी कर्मचारी व्यक्तीने ऑफिसमध्येच महिलेच्या तोंडावर वीर्य उडवले.
दुसऱ्या एका घटनेत एका कर्मचाऱ्याने सहा महिन्यांत सहा वेळा सहकारी महिलेच्या कॉफीत वीर्य टाकले. मात्र कोर्टाने यामुळे कॉफीचा मग खराब झाला हा काही लैंगिक गुन्हा नाही, असं म्हटलं होतं. सातत्याने वाढणाऱ्या या घटना म्हणजे वीर्य दहशतवाद आहेत. महिलांना अवमानित करण्यासाठी हे गुन्हे घडत आहेत. अशा गुन्ह्यांकडे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे म्हणून पहावे, अशी मागणी दक्षिण कोरियातील डेमोक्रॉटीक पार्टीच्या महिला नेत्या रियॉन गार्डीयन्स यांनी केली आहे.