अब्जाधीश पतीला घटस्फोट देऊन शिक्षकासोबत थाटला विवाह

वॉशिंग्टन (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना घटस्फोट दिल्यानंतर मॅकेंझी स्कॉट यांनी एका शिक्षकासोबत विवाह केला आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक डेन जेवेट यांच्यासोबत दुसर्यांदा संसार थाटला आहे. जेफ बेझोस आणि मॅकेंझी स्कॉट यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या …
 

वॉशिंग्टन (महाराष्ट्र न्‍यूज लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना घटस्फोट दिल्यानंतर मॅकेंझी स्‍कॉट यांनी एका शिक्षकासोबत विवाह केला आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक डेन जेवेट यांच्यासोबत दुसर्‍यांदा संसार थाटला आहे.

जेफ बेझोस आणि मॅकेंझी स्‍कॉट यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेझोस यांचा समावेश आहे. एका वेबसाईटवर या लग्नाचा खुलासा झाल्यानंतर मॅकेंझी यांनी याबाबत निवेदन जारी केले. यामध्ये त्यांनी डेन हे एक चांगले व्यक्ती असून मी खुश असल्याचे म्हटले आहे. जेफ बेझोस आणि मॅकेंझी हे विवाहबद्ध होण्यापूर्वी एकत्र काम करत होते. याच ठिकाणी दोघांचे प्रेमसंबंध जुळले. १९९४ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. २५ वर्षे ते एकत्र राहिले. परंतु दोन वर्षांपूर्वी जेफ बेझोस यांचे विवाहबाह्य संबंध एका वृत्तपत्राने उघडकीस आणले. याच कारणामुळे  त्यांच्या  वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाल्याने दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. मॅकेंझी यांनी दोन कादंबरीचे लिखाण केलेले असून श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्या २२ व्या स्थानी आहेत.