आता संघाच्या शाखेत जाऊ शकतात सरकारी कर्मचारी!

नवी दिल्ली : हरियाणा राज्य सरकारने १९६७ आणि १९८० मधील दोन आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे आता हरियाणा सरकारमधील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत सहभागी होऊ शकतात. सरकारच्या या निर्णयाला मात्र काँग्रेसने प्रखर विरोध दर्शविला आहे. १९८० मध्ये तत्कालिन मुख्य सचिवांनी आदेश काढून सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रतिबंध केला होता. …
 
आता संघाच्या शाखेत जाऊ शकतात सरकारी कर्मचारी!

नवी दिल्ली : हरियाणा राज्य सरकारने १९६७ आणि १९८० मधील दोन आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे आता हरियाणा सरकारमधील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत सहभागी होऊ शकतात. सरकारच्या या निर्णयाला मात्र काँग्रेसने प्रखर विरोध दर्शविला आहे.

१९८० मध्ये तत्कालिन मुख्य सचिवांनी आदेश काढून सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रतिबंध केला होता. संघाच्या शाखेत जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची तरतूद करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने तो आदेश रद्द केल्याने आता सरकारी अधिकाऱ्यांना संघाच्या शाखेत जाता येणार आहे. मनोहरलाल खट्टर संघाचे प्रचारक होते. संघाच्या अतिशय जवळचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खट्टर सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. मनोहरलाल खट्टर सरकार चालवत आहे की, संघाची पाठशाळा अशी खोचक विचारणा सुरजेवाला यांनी केली आहे.