२९ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; मढ येथील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, २३ जून रोजी मढ (ता. बुलडाणा) येथे सकाळी उघडकीस आली. दुर्गा गणेश जैवाळ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दुर्गा जैवाळ यांचे पती दिव्यांग आहेत. त्यांच्या उपचारासाठी त्यांना ५ ते ६ लाख रुपये लागणार होते. त्यांचे सासरेही नेहमी आजारी असतात. …
Jun 23, 2021, 15:46 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, २३ जून रोजी मढ (ता. बुलडाणा) येथे सकाळी उघडकीस आली. दुर्गा गणेश जैवाळ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
दुर्गा जैवाळ यांचे पती दिव्यांग आहेत. त्यांच्या उपचारासाठी त्यांना ५ ते ६ लाख रुपये लागणार होते. त्यांचे सासरेही नेहमी आजारी असतात. केवळ दोन एकर शेती व मजुरी करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या. गावातीलच योगेश गावंडे यांच्या पोल्ट्री फार्मवर त्या मजुरी करत होत्या. पोल्ट्री फार्मवरच दुर्गा जैवाळ यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.