साखरखेर्ड्यात किराणा दुकानावरील छाप्यात गुटखा जप्त
साखरखेर्डा (अनिकेत वाघमारे) ः अन्न व औषध प्रशासनाने साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथील गुजरी चौकातील केजीएन किराणा दुकानावर छापा मारून 38 हजार 700 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई काल, 8 मार्चला करण्यात आली. शेख वसीम शेख चाँद असे दुकानमालकाचे नाव असून, दुकानाला सील करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी र. द्र. सोळंके, जी. के. …
Mar 9, 2021, 07:52 IST
साखरखेर्डा (अनिकेत वाघमारे) ः अन्न व औषध प्रशासनाने साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथील गुजरी चौकातील केजीएन किराणा दुकानावर छापा मारून 38 हजार 700 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई काल, 8 मार्चला करण्यात आली. शेख वसीम शेख चाँद असे दुकानमालकाचे नाव असून, दुकानाला सील करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी र. द्र. सोळंके, जी. के. वसावे यांनी ही कारवाई केली. या कारवाई परिसरातील गुटखामाफियांत खळबळ उडाली आहे.