शेतकऱ्याला धमकावणाऱ्या पंचायत समिती सदस्‍य गजानन इंगळेला अटक!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चंदनपूर (ता. चिखली) येथील शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे न दिल्याने आणि शेतकऱ्याने पैसे मागितले असता जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेले भाजपचे पंचायत समिती सदस्य गजानन इंगळे (रा. धोत्रा भणगोजी, ता. चिखली) याला अंढेरा पोलिसांनी काल, 18 फेब्रुवारीला अटक केली. इंगळेकडे त्याचा मुलगा किरणच्या नावाने किरण ट्रेडर्स तर पत्नी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चंदनपूर (ता. चिखली) येथील शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे न दिल्याने आणि शेतकऱ्याने पैसे मागितले असता जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेले भाजपचे पंचायत समिती सदस्य गजानन इंगळे (रा. धोत्रा भणगोजी, ता. चिखली) याला अंढेरा पोलिसांनी काल, 18 फेब्रुवारीला अटक केली. इंगळेकडे त्याचा मुलगा किरणच्या नावाने किरण ट्रेडर्स तर पत्‍नी रंजनाच्या नावाने लक्ष्मी ट्रेडर्सचा अडत परवाना आहे.

चंदनपूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर इंगळे यांच्याकडून गजानन इंगळे याने 9 मार्च 2019 रोजी 97 क्‍विंटल सोयाबीन खरेदी केले होते. या सोयाबीनची रक्कम 3 लाख 49 हजार 777 रुपये अजूनही शेतकऱ्याला मिळाली नाही. वारंवार मागणी केली असता एका पतसंस्थेचे चेक दिला. परंतु तो चेक सुद्धा वटला नाही. पैसे मागायला शेतकरी गेला असता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्‍यामुळे शेतकऱ्याने अंढेरा पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी गजानन इंगळे तसेच चंदनपूर येथे सोयाबीन आणण्याकरिता गेलेला गजानन इंगळे यांचा साडू तेजराव सरोदे, साळा अरुण पवार, राजू पवार (रा. शेलूद, ता. चिखली) , मुलगा किरण इंगळे, पत्नी रंजना इंगळे (धोत्रा भणगोजी, ता. चिखली) यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. काल याप्रकरणातील गजानन इंगळे, तेजराव सरोदे व राजू पवार या तिघांना अटक करण्यात आली आहे. गजानन इंगळेची काल जामिनावर सुटकाही झाली.