लॉकडाऊनचा बळी!; देऊळगाव साकर्शात अविवाहित तरुणाने घेतला गळफास
मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊमुळे घरी परतलेल्या अविवाहित तरुणाने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे आज, 14 जूनला सकाळी समोर आली. गोविंदा अनिल पवार (27, रा. देऊळगाव साकर्शा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. शहाजी श्यामराव पवार (41) यांनी जानेफळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले, …
Jun 14, 2021, 16:38 IST
मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊमुळे घरी परतलेल्या अविवाहित तरुणाने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे आज, 14 जूनला सकाळी समोर आली.
गोविंदा अनिल पवार (27, रा. देऊळगाव साकर्शा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. शहाजी श्यामराव पवार (41) यांनी जानेफळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की काल रात्री गोविंदा शेतात झोपण्यास गेला होता. सकाळी ते शेतात गेले असता गोविंदाने फाशी घेतल्याचे दिसून आले. गोविंदा पुण्याला काम करत होता. मात्र लाॅकडाऊनमुळे तो घरी आला होता. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास ठाणेदार राहुल गोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद टकले, विनोद फुफाटे, श्री. गाभणे करत आहेत.