बुलडाण्यात वडापाववाला अन् दूधवाला भिडले!; दे दना दन मारामारी!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दूधवाला आणि वडापाववाल्यात वाद होऊन मारामारी झाली. यात दूधवाला जखमी झाला. ही घटना बुलडाणा शहरातील जनता चौकातील पंजाब क्लॉथसमोर काल, २३ जुलैला दुपारी चारच्या सुमारास घडली.
विनोद गुलाबराव डुकरे (४१, रा. रामनगर) असे जखमी दूधवाल्याचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून रमेश किसन काळवाघे, अमन रमेश काळवाघे, कुमोद पंडीत कानडजे (रा. धांडे ले आउट बुलडाणा) यांच्याविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डुकरे यांचा जनता चौकात दूध विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानासमोर रमेश किसन काळवाघे याची वडा पाव विक्रीची हात गाडी आहे. काल दुपारी चारला डुकरे यांनी दुकान बंद केले व घरी जाण्यासाठी निघाले. त्याचवेळी त्यांची सायकल रमेश काळवाघे याने अंगावर फेकली. यापुढे सायकल माझ्या गाडीजवळ लावली तर पहा, असे म्हणून त्यांनी शिविगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रमेश काळवाघे व त्याचा मुलगा अमन रमेश काळवाघे, कुमोद पंडीत कानडजे यांनी डुकरे यांना मारहाण केली. पोटात व छातीत बुक्के मारले. शेखर गंगाराम कायस्त यांनी भांडण सोडविले. तपास महिला पोलीस कर्मचारी रेखा डोंगरदिवे करत आहेत.