नियतीचे दृष्टचक्र… वृद्ध कामगाराच्‍या तोंडातला घास हिरावला…चोरट्याने खिशातून गायब केले 45 हजार रुपये; दुसरबीड येथील घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसबीआयमधून पैसे काढून बुलडाणा अर्बन बँकेत भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचे 45 हजार रुपये चोरट्याने खिशातून अलगद उडवले. पैसे भरण्याची स्लीप भरेपर्यंत चोरट्याने केलेला हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. छोटीराम मुंगसाजी शिपे (70, रा. दुसरबीड) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एसबीआयमधून पैसे काढून बुलडाणा अर्बन बँकेत भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचे 45 हजार रुपये चोरट्याने खिशातून अलगद उडवले. पैसे भरण्याची स्‍लीप भरेपर्यंत चोरट्याने केलेला हा कारनामा सीसीटीव्‍ही कॅमेरात कैद झाला आहे.

छोटीराम मुंगसाजी शिपे (70, रा. दुसरबीड) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की 5 एप्रिलला दुसरबीड येथील भारतीय स्‍टेट बँकेच्‍या खात्‍यातून त्‍यांनी 45 हजार रुपये काढले. बँकेच्‍या दरवाजापर्यंत त्‍यांच्‍याकडे पैसे होते. तेथून बुलडाणा अर्बन बँकेत ते पैसे भरण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर स्‍लीप भरत असतानाच चोरट्याने त्‍यांच्‍या खिशातून अलगद ही रक्‍कम काढून घेतली. पैसे भरण्यासाठी गेले असता खिशात पैसे दिसत नसल्याने शिपे यांना धक्‍काच बसला. दोन्‍ही बँकेचे सीसीटीव्‍ही फूटेज तपासले असता मास्‍क बांधलेला एक चोरटा त्‍यांच्‍या मागेच दिसून आला. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी वृत्त लिहीपर्यंत गुन्‍हा दाखल केला नव्‍हता.

पहा व्हिडिओ.

शेवटचा घासही हिरावला…

शिपे हे जिजामाता सहकारी साखर कारखान्यात कामाला होते. कारखान्याच्या साखर विक्रीमधून त्‍यांना पगाराचा शेवटचा हप्‍ता मिळाला होता. दीर्घ लढाईनंतर या कामगारांना हक्‍काचे पैसे मिळाले आहेत. हा शेवटचा घासही चोरट्याने हिरावल्याने दुसरबीडमध्ये संताप व्‍यक्‍त होत आहे.