जलंब पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक
जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जलंब पोलीस ठाण्यात आज, 13 एप्रिलला शांतता समितीची बैठक घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान महिना, रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती उत्सवानिमित्त ही बैठक घेण्यात आली. बैठकीला शांतता समिती सदस्य, जातीय सलोखा समिती सदस्य, पोलीस पाटील, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. …
Apr 13, 2021, 20:39 IST
जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जलंब पोलीस ठाण्यात आज, 13 एप्रिलला शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान महिना, रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती उत्सवानिमित्त ही बैठक घेण्यात आली. बैठकीला शांतता समिती सदस्य, जातीय सलोखा समिती सदस्य, पोलीस पाटील, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हा कोविड महामारीमुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा. शासनाने कोविड महामारी संदर्भाने दिलेच्या मार्गदर्शक सूचनांचे अधिन राहून व पालन करून सर्व नागरिकांनी आगामी सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे. लसीकरण करून घ्यावे, याबाबत बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या.