खेतान स्‍टोअर, रॉयल बूट हाऊस, रोहित प्रोव्हिजनच्‍या मालकांविरुद्ध गुन्‍हा दाखल, शेगावमध्ये कारवाई

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने तीही सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरूच ठेवण्यास मुभा आहे. असे असताना खेतान स्टोअर व रॉयल बूट हाऊस या दोन्ही दुकान मालकांनी दुकाने सुरू ठेवल्याने त्यांच्याविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल, …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. केवळ अत्‍यावश्यक सेवेची दुकाने तीही सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरूच ठेवण्यास मुभा आहे. असे असताना खेतान स्टोअर व रॉयल बूट हाऊस या दोन्ही दुकान मालकांनी दुकाने सुरू ठेवल्याने त्‍यांच्‍याविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काल, 26 मे रोजी ठाणेदार संतोष टाले व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना खेतान चौक परिसरात खेतान स्टोअर सुरू असले दुकानाचा मालक अमोल राधेश्याम खेतान (37) ग्राहकांना दुपारी १ वाजून २९ मिनिटांनी वस्तू विकताना मिळून आला. मास्क न लावता सहा ते सात ग्राहक तिथे होते.  याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रमाणे शहरातील रॉयल बूट हाऊस हे दुकान शेख तौसिफ शेख युसूफ (35) याने सुरू ठेवले होते. दुपारी १२:५७ मिनिटांनी तो ग्राहकी करताना मिळून आला. यावेळी दुकानात चार ते पाच जण तोंडाला मास्क न लावता मिळून आले. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी यांच्या फिर्यादीवरून त्‍याच्‍याही विरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय श्री. इंदोरे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. रोहनकार करत आहेत.

पहूरपूर्णातही कारवाई

पहूरपूर्णा येथील रोहित प्रोव्हिजन या दुकान मालकाविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 26 मे रोजी दुपारी दोनच्‍या सुमारास रोहित प्रोव्हिजन सुरू होते. दुकानमालक गजानन नामदेव धारकर (52, रा. पहूरपूर्णा) हा विना मास्क मिळून आला. पोलीस उपनिरीक्षक नीलेश डाबेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्‍याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ज्ञानदेव ठाकरे करत आहेत.