आजाराला कंटाळून वृद्धाने घेतला गळफास; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गळ्याला कॅन्सरची गाठ झाल्याने हाेणाऱ्या त्रासाला कंटाळून ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, ५ जुलैला सकाळी वाडी (ता. खामगाव) येथे समोर आली. पाच-सहा महिन्यांपासून वाडी (खामगाव) येथील इंदिरानगरातील महादेव गणपत इंगळे आजाराने त्रस्त होते. सकाळी सहापूर्वी त्यांनी गळफास घेतला. या प्रकरणी …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गळ्याला कॅन्सरची गाठ झाल्याने हाेणाऱ्या त्रासाला कंटाळून ६५ वर्षीय वृद्धाने राहत्‍या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना आज, ५ जुलैला सकाळी वाडी (ता. खामगाव) येथे समोर आली. पाच-सहा महिन्यांपासून वाडी (खामगाव) येथील इंदिरानगरातील महादेव गणपत इंगळे आजाराने त्रस्‍त होते. सकाळी सहापूर्वी त्‍यांनी गळफास घेतला. या प्रकरणी श्रीकृष्ण हरिश्चंद्र वानखेडे (४१) यांनी फिर्याद दिली. त्‍यावरून खामगाव शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद घेतली आहे. तपास पोहेकाँ गजानन पाटील करत आहेत.