अल्पवयीन मुलीला पळवले, मच्छिंद्रखेड येथील घटना, तरुणाच्या दोन मित्रांविरुद्धही गुन्हा दाखल
जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 16 वर्षीय मुलीला 19 वर्षीय तरुणाने पळवून नेले. त्याला दोघांनी मदत केली. त्यामुळे जलंब पोलिसांनी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल, 16 जूनला दुपारी तीनच्या सुमारास घडली. आज, 17 जूनला मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. रोशन बांगर (19, रा. पारखेड), आकाश बाळकृष्ण वाकोडे (22, रा. मच्छिंद्रखेड), पवन …
Jun 17, 2021, 17:41 IST
जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 16 वर्षीय मुलीला 19 वर्षीय तरुणाने पळवून नेले. त्याला दोघांनी मदत केली. त्यामुळे जलंब पोलिसांनी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल, 16 जूनला दुपारी तीनच्या सुमारास घडली. आज, 17 जूनला मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली.
रोशन बांगर (19, रा. पारखेड), आकाश बाळकृष्ण वाकोडे (22, रा. मच्छिंद्रखेड), पवन जाधव (21, रा. सुनगाव) अशी संशयितांची नावे आहेत. रोशनने मच्छिंद्रखेड (ता. शेगाव) येथील अल्पवयीन मुलीला काल दुपारी फूस लावून पळवले. त्याला या कामात आकाश आणि पवन यांनी मदत केली, असे मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरिक्षक राहुल कातकाडे करत आहेत.