काथरगाव बसथांब्याजवळ विजेचा धक्का : युवकाचा मृत्यू, एक जखमी

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :वरवट-शेगाव मार्गावर काथरगाव येथील बसथांब्याजवळ सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला. विजेचा धक्का बसून एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. योगेश भानुदास देवकुडे (वय २८, रा. काथरगाव) असे मृतकाचे नाव आहे तर आदित्य सुनील सरदार (वय २०) हा जखमी झाला आहे.

शेगाव ते वरवट मार्गावर असलेल्या काथरगाव येथील बसस्थानकावर दोन युवकांना विजेचा जबर धक्का बसला.यामध्ये योगेश देवकुडे याचा मृत्यू झाला तर सुनील सरदार हा युवक जखमी झाला.
देवकुडे यांच्या निधनामुळे पत्नी, दोन लहान मुले आणि वडील या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आदित्य सुनील सरदार याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर काथरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.