गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू! दुसऱ्याला वाचवले; खामगाव तालुक्यातील घटना...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवन गणेश मोहीते वय २१, रा. वझर हा गावातील मंडळातील इतर ७-८ कार्यकर्त्यांसोबत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी बसस्टॉपजवळील तलावात उतरला होता. गणपती विसर्जनादरम्यान अचानक त्याचा पाय घसरून तो खोल पाण्यात गेला. दरम्यान, त्याच्यासोबत असलेला रोशन नामदेव मोहीते हा देखील पाण्यात बुडू लागला मात्र मंडळातील कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे त्याला तत्काळ बाहेर काढून आले. दरम्यान पवन शुद्धीवर आणण्यात मोहीतेचा शोध घेतला असता तो पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाल्याचे स्पष्ट झाले. गावकऱ्यांनी त्याचा बराच शोध घेतला, मात्र अंधार आणि पाण्याचा भराव जास्त असल्याने अडचणी आल्या. त्यानंतर एसडीआरएफ पथकाच्या मदतीने शोध मोहीम राबवून त्याला बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. या घटनेमुळे वझर गावात शोककळा पसरली असून हिवरखेड पोस्टेला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.