वरुड येथील युवा शेतकऱ्याने घेतला गळफास; नापीकी आणि कर्जाचा हाेता डाेंगर; शेतात उत्पादन हाेत नसल्याने हाेते शेतकरी संकटात..!
Aug 25, 2025, 21:01 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डाेंगराला कंटाळून ४० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना २५ ऑगस्ट राेजी उघडकीस आली. सखाराम उत्तम मघाडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
सखाराम मघाडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे ग्रामीण बँक धाड येथील सुमारे दीड लाख रुपयांचे पीककर्ज थकले होते. तसेच त्यांनी खासगी हात उसणे कर्जही घेतले होते. गेल्या काही वर्षांपासून बोंडअळीचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, उत्पादनातील घट आणि नापिकी यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. शेतीचा खर्च, घरखर्च आणि संसाराचा भार पेलता न आल्याने ते नैराश्यात होते. त्यातूनच त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आई व आप्त परिवार आहे.