गेम करना पड़ेगा तेरा..!मेसेज पाठवून 'युवा हिंदू प्रतिष्ठानचे संस्थापक' रोहित पगारिया यांना जीवे मारण्याची धमकी!

 
 खामगाव ( :भागवत राऊत (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
"गेम करना पड़ेगा तेरा.." असा धमकीचा मेसेज देत 'युवा हिंदू प्रतिष्ठान'चे संस्थापक रोहित सुरजमल पगारिया (वय ३६, रा. खामगाव) यांना अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
१७ जून रोजी खामगावच्या तलाव रोड परिसरात एका बोलेरो पिकअप गाडीत गौवंशाचे अवशेष असल्याची माहिती मिळाल्यानंतर रोहित पगारिया यांनी ती गाडी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केली होती. त्यांनी ही घटना माध्यमांद्वारे जनतेसमोर आणली होती.
याच संदर्भातील बाईट प्रसारित झाल्यानंतर, १९ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या Instagram आयडी (Rohitpagariya) वरून 'abidqureshi17' या आयडीधारकाने "गेम करना पडेगा तेरा" असा धमकीचा मेसेज पाठविला.
धमकीची गंभीर दखल घेत रोहित पगारिया यांनी आपल्या मित्रासोबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार विजय उभे करीत आहेत.