शेगावच्या महाराज लॉजवर तरुणीवर बलात्कार! बलात्कारी म्हणतो, लग्न कर नाहीतर आत्महत्या करतो.

 

 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव येथील महाराज लॉज वर एका तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीचे वय २७ वर्षे आहे.

 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण आणि पीडीता दोघेही अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवाशी आहेत. दोघांचे आधी मैत्री आणि मैत्रीतून प्रेमात रूपांतर झाले. लग्नाच्या आणा - भाका दोघांनी घेतल्या. त्यातून आरोपी तरुण योगेश याची अधिकच जवळीक तरुणीसोबत झाली. त्यानंतर योगेश तरुणीला घेऊन शेगावला आला.👇
  शेगाव येथील महाराजा लॉज मध्ये योगेशने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर हा प्रकार जवळजवळ वर्षभर सुरू होता. अनेकदा तो तिला घेऊन शेगावला यायचा, महाराजा लॉज मध्ये न्यायचा अन् नको ते करायचा. दरम्यान याचवेळी तरुणीच्या कुटुंबीयांनी तिच्या लग्नाची तयारी चालवली होती, तेव्हा तू जर लग्न केले नाही तर मी आत्महत्या करीन अशी धमकी योगेश द्यायचा असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून योगेश विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...