रस्त्यात अडवून महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विधवा महिलेचा विनयभंग केल्याची घटना बोराखेडी पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात १२ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमरास घडली. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

jahirat

ADVT 👆🏻

 

फिर्यादी महिला ही कामाला जात असतांना राजेंद सुरेश भामंद्रे रा.पिंपळखुटा खु. हा स्कुटी घेवून आला व त्याने फिर्यादीचा हात धरुन जवळ ओढत विनयभंग केला. यावेळी फिर्यादीने आरडाओरड केल्याने आरोपी पळून जात असतांना त्याने सदर घटना कोणाला सांगीतली तर तूला व तुझा मुलींना मारुन टाकीन, अशी धमकी दिली. फिर्यादीने घरी परत येवून सदर घटना नातेवाइकांना सांगीतली.

फिर्यादीचे नातेवाइक आरोपीकडे जाब विचारण्यास गेले असता आरोपीने त्यांनाही लोटपाट केली अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी राजेंद्र भामंद्रे रा. पिंपळखुटा याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७४, ३५१ (२), ११५ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास एपीआय बालाजी शेंगेपल्लू हे करीत आहेत.