दुचाकीवरून पडलेल्या महिलेल्या महिलेला ट्रकने चिरडले; जागीच मृत्यू, दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; पती, चिमुकला सुदैवाने बचावला...
Dec 11, 2025, 12:36 IST
सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बुद्रूक येथील भारतीय सैन्यात कार्यरत व सध्या सुट्टीवर असलेले प्रमोद सुरेश गवई (वय ३२) हे पत्नी कोमल गवई (वय २५) व लहान मुलासह एमएच-३०-बीके-४९९९ क्रमांकाच्या बुलेटने सासुरवाडी लोणार येथे जात होते.
दरम्यान, समोर चालणाऱ्या अज्ञात बैलगाडीला दुचाकीची धडक बसल्याने मोटारसायकल अचानक थांबली. त्यात पाठीमागे बसलेल्या कोमल गवई रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी अहिल्यानगरकडे जाणारा ट्रक (क्रमांक एमएच-२१-बीडब्ल्यू-३३४४) महिलेच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेड राजा येथे पाठविण्यात आला.पुढील तपास किनगाव राजा पोलीस करीत आहेत.
