मॅटर मागे घे म्हणत महिलेला मारहाण! आठ जणांवर गुन्हा; देऊळगावराजाची घटना......

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): न्यायप्रविष्ट असलेले प्रकरण मागे घेण्यासाठी एका महिलेवर दबाव टाकण्यात आला. त्यासाठी तिला आठ जणांकडून मारहाण करण्यात आली. देऊळगाव राजा शहरात ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 तक्रारदार महिलेचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. प्रकरण मागे घेण्यावरून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. याप्रकरणी तक्ररीवरून पोलसांनी असलम शहा खलील शहा, खालील शहा मिया शहा, अफजल शहा खलील शहा, सलमा बी खालील शहा (सर्व रा. साखरखेर्डा), अजिस उर्फ जुम्माशहा आयुब शहा, आसमा बी अजिस शहा दोन्ही (रा. आमठाणा, ता. सिल्लोड), समीर पटेल (रा. साखरखेर्डा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.