

आशीर्वाद गेस्ट हाऊसला कुणाचा आशीर्वाद? बिनधास्त चालतो "तो "कार्यक्रम! "त्या" कामासाठी नांदेडवरून दोघींना आणले;पोलिसांनी मारला छापा...
Mar 18, 2025, 14:37 IST
शेगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेगावच्या आशीर्वाद गेस्ट हाऊस मध्ये नांदेड जिल्ह्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून बळजबरीने देहव्यापार करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना पोलिसांनी तब्यात घेतले असून दोघींची सुटका केली आहे.
शेगाव येथील इक्बाल चौक परिसरातील आशिर्वाद गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता शेगाव शहर पोलिसांनी आशिर्वाद गेस्ट हाऊसवर छापा मारला असता यावेळी पोलिसांनी हुसेन खान अजगर खान (३४), रा. गायत्री मंदिर पश्चिम गेट, शेगाव, कुलदिप जिजाराम अवचरमल (२८), रा. चितेगाव, ता.जि. संभाजीनगर व निखिल हिंमतलाल काहार (२७), रा. शिवाजी स्कुल जवळ अकोट या तिघांनी दोन महिलांना देहव्यापारा साठी भाग पाडून आणले असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पीएसआय कुणाल जाधव यांनी शेगाव शहर पोस्टेला फिर्याद दिली. यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून तब्यात घेतले आहे.