रात्रीच्या अंधारात मलकापुरात कोण घालत होतं धुमाकूळ? अखेर पोलिसांनी उघड केला 'त्या' टोळीचा काळाकुट्ट कारनामा...
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख साबीर शेख अहेमद (वय ३२), जावेद खान मुसा खान (वय ३८, दोघे रा. सायकलपुरा) तसेच मो. सोहेल मो. रफीक (वय २९, रा. पंतनगर, मलकापूर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी शहरातील विविध भागांत चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १ लाख रुपयांचे हाऊस वायर, ५० हजार रुपयांचे कृषी साहित्य, ६० हजार रुपयांचे प्लंबिंग साहित्य, ६० हजार रुपयांचे महावितरण कंपनीचे केबल, तसेच चार मोटारसायकली असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.कारवाईत डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे तसेच पोलीस कर्मचारी आसिफ शेख, संतोष कुमावत, प्रवीण गवई, योगेश तायडे, गणेश बरडे, दिपक सोनोने, नवल राठोड आणि मिनल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.