कोणता जावई सासू सोबत असं करतो..? पत्नी नांदायला येत नव्हती म्हणून त्याने...! संग्रामपूरत नेमकं काय घडलं ...वाचा

 
 संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): त्याची पत्नी त्याच्याकडे नांदायला येत नव्हती..म्हणून जावयाने सासु वर हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे घडला आहे. गंभीर जखमी सासू वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

 याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर जावयाला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार पती दारू पिऊन पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे आरोपीची पत्नी माहेरी आईकडे पातुर्डा येथे राहण्यासाठी गेली होती. दरम्यान आरोपी जावई पांडुरंग आढाव पत्नीला आणण्यासाठी सासुरवाडीत गेला होता. तिथे पती-पत्नीत वाद झाला. या वादातून त्याने सासु वरच चाकूने प्राण घातक हल्ला केला.या हल्ल्यात भार्गताबाई जगदेव बोबडे (४९) गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणानंतर जखमी अवस्थेत त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे..