नैतिकतेचा धडा देणारेच जेव्हा अनैतिक जगतात..! शेगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची महिलेसोबत जवळीक, गुप्त चॅटिंग..व्हिडिओ कॉल व्हायचे! महिलेच्या पतीने रंगेहात पकडले..आता थेट "एसपीं"कडे तक्रार...
Jun 10, 2026, 11:36 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगावच्या पोलीस विभागात एक खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेच्या पतीने थेट पोलिस अधीक्षकांकडे एका पोलीस उपनिरीक्षकाची तक्रार केली आहे. हा पोलीस उपनिरीक्षक आपल्या संसाराची राख रांगोळी करत असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.. तक्रारदाराच्या पत्नीशी पोलीस उपनिरीक्षकाने जवळीक साधली, गेल्या सात-आठ महिन्यांपासून त्यांच्यात गुप्त चॅटिंग व्हिडिओ कॉल सुरू होतो असा आरोप आहे.
शेगाव येथील ४४ वर्षे तक्रारदाराने यासंबंधीची तक्रार दिली आहे. जुन्या ओळखीच्या माध्यमातून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांचे तक्रारदाराच्या घरात येणे जाणे सुरू झाले होते. या कौटुंबिक संबंधाचा गैरफायदा घेत पोलीस उपनिरीक्षक आणि तक्रारदाराच्या पत्नीशी जवळीक साधली.
तक्रारदार मजुरीच्या कामासाठी दिवसभर घराबाहेर राहत असल्याचा फायदा घेतला. मागील सात आठ महिन्यांपासून तक्रारदाच्या पत्नी आणि सदर पोलीस उपनिरीक्षक यांच्यात गुप्त चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल सुरू होते असा आरोप पीडित पतीने केला आहे.१९ एप्रिल रोजी दुपारी तक्रारदार यांनी स्वतः आपल्या पत्नीला घरात व्हिडिओ कॉल वर रंगेहात पकडले. तक्रारदाराने शेगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असता पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून इतर पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी. पोलिसांनी ही तक्रार घरगुती वाद असल्याचे सांगून केवळ चौकशीवर ठेवली असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.