चिखलीच्या सिद्ध सायन्स चौकात विवाहितेसोबत चुकीचं घडलं! मागून आला अन् शुक शुक.....

 
Bhajap
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीत एका विवाहितेचा विनयभंग झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. २५ सप्टेंबरच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी हा चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथील राहणारा आहे.
 विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार घटना २५ सप्टेंबरच्या संध्याकाळी साडेसहाची आहे. विवाहिता सिद्ध सायन्स चौकातील महादेव मंदिराच्या बाजूने उभी होती. त्यावेळी आरोपी विजय मार्तंड ठेंग तिथे आला. तू मला आवडतेस , माझ्यासोबत घरी चल असे म्हणत त्याने वाईट उद्देशाने हात पकडला.
विवाहितेने विरोध केला असता शिवीगाळ केली. तिला आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्याआधी देखील विजय ठेंग याने विनयभंग केला होता. विवाहितेचा पाठलाग करून जवळीक साधण्याच्या इच्छेने पाठीमागून शुक शुक करून अश्लील हाव-भाव केले होते असेही विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.