चिंचखेड मध्ये हे काय झालं?.४ दिवसांपासून गायब होता, कुजलेला मृतदेहच सापडला...

 
देऊळगावराजा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचखेड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा थेट मृतदेहच सापडला.. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असल्यामुळे, हत्या की आत्महत्या? असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत..
चिचखेड येथील शेतकरी किशोर वायाळ यांचे गावाशेजारीच शेत आहे. या मक्याच्या शेतातील विहिरीजवळ काल एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती अंढेरा पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार विकास पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बराच वेळ मृतदेह कोणाचा याबद्दलची ओळख पटत नव्हती, काही वेळानंतर गावातीलच एक व्यक्ती चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. 
Kayande
Advt.

  त्यानंतर त्या बेपत्ता व्यक्तीच्या पत्नी व मुलांना घटनास्थळी आणण्यात आले, त्यावेळी त्यांनी मृतदेह ओळखला. विजय रामा जाधव (३५) याचा हा मृतदेह असल्याचे समोर आले. मात्र विजय चा मृत्यू कसा झाला, याबद्दल नेमके कारण समोर आले नाही. तपास ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कैलास उगले करीत आहेत.