"इश्क मे हम तुम्हे क्या बताये"! प्रेयसी सोडून गेली म्हणून प्रियकराने केली आत्महत्या; इन्स्टाग्रामवर शेअर केली दुःखी स्टोरी...

 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रेयसीच्या विरहात प्रियकराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथे हा प्रकार घडला. समाधान आटोळे (२५) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमवीराचे नाव आहे. 

समाधान आटोळे याचे लग्न झालेले आहे. पत्नी देखील त्याच्यासोबत राहत होती. दरम्यान अशातच सिंदखेडराजा तालुक्यातीलच एका गावातील २८ वर्षीय विवाहितेवर त्याचे मन जडले. तो तिच्या प्रेमात पडला.. पत्नी असताना देखील त्या विवाहित प्रेयसीला सोबत घेऊन तिघेही ते एकत्र राहत होते. गेल्या दोन महिन्यांपासून समाधान त्याची प्रेयसी आणि पत्नी असे एकत्र राहत होते..दरम्यान १३ मार्चच्या सायंकाळी त्याची प्रेमिका काहीही न सांगता घरातून निघून गेली. त्यामुळे तो अस्वस्थ झाला..

१३ मार्चपासून तो सातत्याने दारू पीत होता. दरम्यान काल दुपारी साडेतीन वाजता केशवशिवनी ते दुसरबीड मार्गावर त्याने प्रेयसीला उद्देशून इंस्टाग्राम वर एक दुःखी गाण्याचा व्हिडिओ शेअर केला..त्या व्हिडिओ सुरू असताना त्याने लाइव्ह विष प्राशन करून आत्महत्या केली..

  विष घेतल्यानंतर तो बेशुद्ध पडलेला होता. याबाबत कुटुंबीयांना माहिती पडतात कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. अथ्यवस्थ अवस्थेत समाधान ला ॲम्बुलन्स द्वारे सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले..