

असा कसा नवरा! पत्नी ७ महिन्यांची गर्भवती तरीही पतीने नको ते केले! देऊळगावमहीची घटना...
Dec 28, 2024, 09:10 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विवाहित महिलांवरील कौटुंबिक छळाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बुलडाणा जिल्हा पोलीस दलाकडून स्थापन करण्यात आलेल्या भरोसा सेलकडून आधी पती-पत्नीचे समुपदेशन करून घरातील वाद घरातच मिटवण्याचा प्रयत्न केल्या जातो. मात्र वाद टोकाचा असेल तेव्हा पोलिसांचा देखील नाईलाज होतो. आता देऊळगावमही येथील एका विवाहितेने तिच्या पतीविरुद्ध तक्रार दिली आहे..हुंड्यासाठी पतीने अतोनात छळ केला. ती ७ महिन्यांची गर्भवती होती तरीदेखील पतीने तिच्या सोबत चुकीचे वर्तन केले असा आरोप तिने तक्रारीत केला आहे..
विवाहितेचे माहेर बुलढाणा आहे. सध्या विवाहिता माहेरीच राहते. तक्रारीनुसार गर्भवती असताना विवाहितेला घराबाहेर हाकलून लावले. अखेर बुलढाण्यात माहेरी वास्तव्यास असलेल्या पीडित महिलेने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सानिया परवीन इम्रान खान असे पीडित विवाहितेचे नाव आहे. देऊळगाव मही येथील इम्रान खान जावेद खानसोबत १४ मे २०२३ रोजी तिचे लग्न झाले. लग्नानंतर मात्र पती इम्रानसह नासिमबी वाहेद खान, वाहेद खान पठाण, शबनमबी शेख पप्पू (अंढेरा), रुखसार परवीन शाहनवाज (अंढेरा), शेख पप्पू शेख अयूब (कासारखेडा, एमआयडीसी वाळूज) यांनी छळ सुरू केला.तुझ्या आई, वडिलांनी हुंडा दिला नाही. लग्नात मानपान केला नाही. ५० हजार रुपये आणण्याची मागणी करीत तिचा छळ करण्यात आला. मोलकरीणसारखी वागणूक देत उपाशी ठेवले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. तसेच सात महिन्यांची गर्भवती असताना सानियाला पती व सासूने घरातून हाकलून दिले. मुलगा झाल्यावरही पती पाहण्यासाठी आला नाही. सासरचा जाच संपत नसल्याने महिलेने पोलिसांत धाव घेतली.