चिखलीतील राजघराणा कापड केंद्राचे मालक विष्णु पाटील पडघान यांचे अपघाती निधन! इनोव्हा ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली...!
Jan 31, 2025, 08:51 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथील व्यावसायिक, राजघराणा कापड केंद्राचे मालक विष्णु पाटील पडघान यांचे अपघाती निधन झाले. काल,३० जानेवारीच्या सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मेहकर चिखली रस्त्यावरील हिवरा आश्रम नजिक पोखरी फाट्यावर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला..
मेहकर कडून चिखलीच्या दिशेने येत असताना त्यांची इनोव्हा ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांचा चालक थोडक्यात बचावला.विष्णू पाटील पडघान हे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य होते. याशिवाय चिखली शहरातील प्रतीथयश अशा राजघराणा कापड केंद्राचे मालक होते. ग्रामीण भागातील नागरिकांशी त्यांची नाळ जुळलेली होती. विष्णू पाटील पडघान यांच्या अचानक झालेल्या निधनाने चिखली शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.