

UPDATE खामगाव– शेगाव मार्गावरील अपघातातील मृतांची संख्या वाढली; आणखी दोघांचा मृत्यू! एकूण ७ जणांचा मृत्यू! मृतक आणि जखमींची नावे वाचा बातमीत...
Apr 2, 2025, 11:38 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज,२ एप्रिलच्या पहाटे खामगाव शेगाव मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. पहाटे साडेपाचला घडलेल्या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता तर २४ जखमी झाले होते. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर होती.. दरम्यान आता हाती आलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या आणखी दोन ने वाढली आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता ७ झाली आहे.. अपघातातील काही मृतांची नावे "बुलडाणा लाइव्ह" ला प्राप्त झाली आहेत..
आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार बोलेरो वाहनातील ४ प्रवाशी ठार झाले आहेत. धनेश्वर मरावी रा. मध्य प्रदेश, कृष्णकुमार मोहन सिंह सरोते वय २० वर्ष, शिवपाल आणि शिवाजी समाधान मुंडे वय ५५ वर्ष रा. एसबीआय कॉलनी शेगाव अशी बोलेरो वाहनातील मृतांची नावे आहेत तर इंद्राणी ट्रॅव्हल्स मधील मेहरुनिसा शेख हबीब (४५ वर्ष रा.धुळे मालेगाव) ही महिला ठार झाली आहे. यात आणखी दोन मृतांची संख्या वाढली असून ते कोणत्या वाहनात होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
काय आहे घटना...
आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास खामगाव शेगाव मार्गावरील जयपूर लांडे फाट्याजवळ भरधाव बोलेरो कार(एम एच २८, एझेड ३३१४) उभ्या एसटी बसवर( एमएच १४, एलबी २३४४)धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी इंद्राणी ट्रॅव्हल्सची बस (एम एच १५, इएफ –४०४१) प्रवासी बस अपघात ग्रस्त वाहनांना धडकली. या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून २४ गंभीर जखमी झाले होते.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णाला दाखल करण्यात आले होते. आत्ता हाती आलेल्या माहितीनुसार अपघातातील मृतांची संख्या आणखी २ ने वाढून ७ झाली आहे..
जखमींची नावे...
१) शिव धनसिह धुर्वे वय ४७ वर्ष रा. मध्य प्रदेश
२) कोमल गणेश गंधारे वय ५९ वर्ष रा. अहमदनगर
३) वांगे प्रतीक्षा मुकुंदराव वांगे वय २६ वर्ष रा. ब्राह्मणवाडा थळी तालुका चांदुर बाजार अमरावती
४) सत्यपाल गुलाबराव गवई वय ४० वर्ष रा. लावखेड तालुका पातुर जिल्हा अकोला
५) सुमन सुखदेवराव भोंडे वय ७०वर्ष रा. अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती
६) सुखदेव अमृत भोंडे वय ८१ वर्ष रा. अंजनगाव सुर्जी
७) दत्ता रामधन मोरखडे वय ४५ वर्ष रा. हिवरखेड रुपराव तालुका तेल्हारा
८) बापूराव रामकृष्ण सवाने वय ८०वर्ष रा. वझर मेग तालुका निफाड जिल्हा नाशिक
९) साजिया परवीन शेख हबीब वय १०वर्ष रा. धुळे मालेगाव
१०) शेख हबीब अब्दुल रजाक वय ५० वर्ष रा. धुळे मालेगाव
११) रंजीत वानखेडे वय ४० वर्ष रा.मूर्तिजापूर
12
१२) धनराज नागोराव उगले वय ३७ वर्ष रा. बिलोरा विमानतळ अमरावती
१३) आशिष सुखदेवराव नवले वय ४० वर्ष रा. अमरावती
१४) प्रल्हादराव शिवरामजी आवंडकर वय ७५ वर्ष रा. अंजनगाव सुर्जी
१५) वरद चित्रांगण रेवंदले वय ६ वर्ष रा. कुणाला पाहिजे फुरसुंगी बाग पुणे
१६) वंदना देवानंद पांडवकर वय ५१ वर्ष रा. अंजनगाव सुर्जी
१७) पुरुषोत्तम नारायण शिनकर वय ७२ वर्ष रा. करजगाव तालुका चांदुर बाजार
१८) सौ शालिनी पुरुषोत्तम शिनकर वय ६५ वर्ष रा. करजगाव तालुका चांदूरबाजार