Update : मळणीयंत्रात अडकून युवकाचा मृत्‍यू; जळगाव जामोद येथील घटना

जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हरभरा काढत असताना जळगाव जामोद येथील संदीप मारुती मिसाळ (30) या तरुणाचा मळणीयंत्रात अडकून मृत्यू झाला. ही घटना आज, 11 मार्चला सकाळी नऊच्या सुमारास जळगाव जामोदजवळील सजनपुरी शिवारात घडली. संदीप मारुती मिसाळ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो अविवाहित होता. संदीप हा किसन रामा काळपांडे …
 

जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हरभरा काढत असताना जळगाव जामोद येथील संदीप मारुती मिसाळ (30) या तरुणाचा मळणीयंत्रात अडकून मृत्यू झाला. ही घटना आज, 11 मार्चला  सकाळी नऊच्‍या सुमारास जळगाव जामोदजवळील सजनपुरी शिवारात घडली.

संदीप मारुती मिसाळ असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो अविवाहित होता. संदीप हा किसन रामा काळपांडे यांच्या शेतातील हरभरा काढण्यासाठी ट्रॅक्टरवरील मळणी यंत्रावर कामावर आला होता. हरभरा काढत असताना त्याचा हात यंत्रात गेला. त्‍यातच तो आतमध्ये ओढला गेला. मळणी यंत्रात अडकून जागीच त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्‍णालयात पाठवला. तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत.