अवकाळी पावसाचा कहर! विजेच्या धकक्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान – तीन जनावरे ठार! कोलवड शिवारातील घटना! लाखोंचे नुकसान....
May 16, 2025, 16:22 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : काल दुपारपासून बुलडाणा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामध्ये विजेच्या कडकडाटासह वातावरणात अचानक बदल झाला. या नैसर्गिक आपत्तीत कोलवड शिवारातील एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

श्रीकृष्ण जाधव या शेतकऱ्याच्या बुलडाणा-अजिंठा रोडवरील शेतावर वीज कोसळून दुबती गाय, एक वासरू आणि एक वगार (म्हशीचे पिल्लू) असे तीन जनावरे जागीच मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तालाठी यांनी पंचनामा केला असून, श्री. जाधव यांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे.