शेलार नदीत अज्ञात युवकाचा आढळला मृतदेह; शेलगाव देशमुख येथील घटना; डाेणगाव पाेलिसांनी केली अकस्मिक मृत्यूंची नाेंद!
Aug 9, 2025, 20:10 IST
डाेणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथील शेलार नदीत २५ ते ३० वर्षीय अज्ञात युवकाचा कुजलेला मृतेदह ९ ऑगस्ट राेजी सकाळी आढळला.या प्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी अकस्मिक मृत्यूंची नाेंद केली आहे. दरम्यान, या युवकाची हत्या कि आत्महत्या याचा तपास पाेलीस आहेत.
शेलगाव देशमुख येथील शेलार नदीच्या पात्रात शनिवारी सकाळी ९ वाजता २५ ते ३० वर्षाच्या युवकाचा कुजलेला मृतदेह आढळला.याविषयी पाेलीस पाटील संतोष वामन सोनुने यांनी डाेणगाव पाेलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम १९४ BNSS अंतर्गत मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याला उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथे पाठविण्यात आले. दरम्यान, हा मृतदेह नदीत कसा आला आणि यात काही घातपाताचा संबंध आहे का, याबाबत परिसरात चर्चा रंगल्या आहेत.