

गुंजाळा येथे अज्ञात जळक्याने सोयाबीनची सुडी पेटविली, नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे हजारोचे नुकसान
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुंजाळा येथील शेतकरी भीमराव वानखेडे यांचे गावालगतच गट नंबर 140 मध्ये एक एकर जमीन आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन पेरणी केली होती. त्या शेतावर त्यांची बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे पीक कर्ज घेतले होते अशी माहिती मिळाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह व बँकेचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी शेतात सोयाबीनचा पेरा करून चांगल्या प्रकारचे उत्पन्न होईल या आशेने चांगलीच मेहनत घेतली होती. आणि सोयाबीनचे पीक ही चांगले आले होते.
सोयाबीनची सोंगणी करून त्यांनी शेतामध्ये सुडी घातली होती. पावसाने सुडी भिजू नये म्हणून त्यावर महागडी ताडपत्री टाकली होती.सोयाबीनची सुडी काढण्याची बाकी होती परंतु परतीचा पाऊस सुरू झाल्यामुळे सुढी काढणे लांबले. पाऊस उघडल्यानंतर ते कुटुंब सुढी काढणार होते परंतु 18 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान कोणी अज्ञात व्यक्तीने पेट्रोल व डिझेल टाकून सोयाबीनची सोडी पेटवून दिली. घटनेची माहिती शेजारी शेतकऱ्याने फिर्यादीला दिली. हे कुटुंब शेतात जाऊन पाहतात तर सुडीची सुडीवर झाकण ठेवलेल्या ताडपत्रीसह जळून राख झालेली होती. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले झाले असून या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे. या घडलेल्या घटनेमुळे बाकीचे शेतकरी हैराण व भयभीत झाले आहे. तरी या घटनेचा महसूल व पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनेचा पंचनामा करून आरोपीला शोधून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.