दुर्दैवी! शेतकरी दांपत्याने सोबतच घेतला गळफास; भरोसा येथील घटनेने समाजमन हळहळले....
Jul 24, 2025, 18:30 IST
मेरा खुर्द(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील भरोसा येथे आज सायंकाळी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली. शेतकरी पती-पत्नीने शेतात झाडाला गळफास घेऊन सोबतच जीवन यात्रा संपवली. गणेश श्रीराम थूट्टे (५५) आणि सौ. रंजना गणेश थूट्टे(५०) अशी आत्महत्या केलेल्या शेतकरी दांपत्यांची नावे आहेत.
शेतकरी दांपत्य हाडाचे शेतकरी होते. आज सायंकाळी त्यांज गट नंबर ३१७ मधील दोन वेगवेगळ्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. घटनेच्या वेळेस त्यांची सून बकऱ्या चारायला गेलेली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर समाजमन हळहळले आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शेतीत सातत्याने होणारे नुकसान, हुमणी अळीने गेलेले सोयाबीन यामुळे ते चिंतेत होते. याप्रकरणी पुढील कारवाई अंढेरा पोलिसांकडून सुरू आहे.