दुर्दैवी! वीस वर्षीय तरुणाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू;खामगाव तालुक्यातील घटना..

 
 खामगांव (भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वीस वर्षीय तरुणाचा स्वतःच्या शेतातील विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. पवन रमेश धानोरे (२०) रा.नागापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पवन हा आपल्या स्वतःच्या शेतात आज ११ जून रोजी सकाळी साडेअकरा बारा वाजताच्या दरम्यान पाणी आणण्याकरिता गेला होता.मात्र अचानक त्याचा तोल जाऊन तो विहिरीत कोसळला. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिस घटनास्थळी पोहोचले होते बातमी लिही पर्यंत पवन ला विहिरीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू होती. पवन च्या घरी त्याच्या पश्चात त्याचा लहान भाऊ, आई - वडील आहेत. पवन च्या जाण्याने नागापूर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.