दुचाकी चाेरट्यास केले गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई; बुलढाणा शहरातील आठवडी बाजारातून दुचाकी केली हाेती लंपास...
Oct 18, 2025, 14:28 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरात गत काही दिवसांपासून दुचाकी चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. या वाढत्या चाेरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाेरट्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शहरातील आठवडी बाजारातून दुचाकी लंपास करणाऱ्या चाेरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. आराेपीस पुढील तपासासाठी बुलढाणा शहर पाेलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बुलढाणा शहरातील आठवडी बाजारातून ९ जून २०२४ राेजी चाेरट्याने दुचाकी लंपास केली हाेती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर पवन भगवान बरडे रा.उमरा ता. पातुर अकोला यास अटक केली. त्याच्याकडून पाेलिसांनी चाेरी केलेली दुचाकीही जप्त केली.
ही कारवाई पाेलीस अधीक्षक निलेश तांबे अपोअ खामगाव श्रेणिक लोढा व अपोअ बुलढाणा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने एपीआय यशोदा कणसे, हेकाॅ राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, एनपीसी विजय वारुळे, एनपीसी सुनील मिसाळ, पाेकाॅ मंगेश सनगाळे, पाेकाॅ गणेश वाघ आणि कैलास ठाेंबरे, हेकाॅ समाधान टेकाळे यांनी केली.