बुलडाणा बस स्थानक परिसरातून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बस स्थानक परिसरातून चोरट्याने दुचाकी लंपास केली असून हा प्रकार सीसी कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध बुलडाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या चोरीच्या घटनामुळे प्रवाशांमध्ये चोरीच्या भीतीचे वातावर निर्माण झाले आहे.
शशिकांत सपकाळ यांनी आपली एमएच २८ बीई ३९५० क्रमांक असलेली शाईन कंपनीची दुचाकी बस स्थानक परिसरात लावली होती. आपले काम आटोपल्यानंतर सपकाळ यांनी दुचाकी लावलेल्या ठिकाणी जाऊन बघितले असता दुचाकी दिसून आली नाही. बऱ्याच वेळ शोध घेतल्यानंतर देखील दुचाकी दिसून न आल्याने त्यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठले आणि प्रकरणाची तक्रार दाखल केली. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार बस स्थानक परिसरात लागलेल्या सीसी कॅमेरात कैद झाला आहे. बस स्थानक परिसरात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनामुळे प्रवाशांमध्ये चोरट्यांची भीती निर्माण झाली आहे.