भरधाव ट्रकने दोघांना चिरडले; बिबी जवळील घटना...

 
बिबी
 बिबी(जयजीत आडे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दोघांना चिरडल्याची घटना २ ऑक्टोबरच्या सायंकाळी बिबी जवळील चिखला फाट्यावर घडली. अपघात ठार झालेले दोघे पिंपरी खंदारे येथील राहणारे आहेत.
Disha
Advt.👆

लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील बंडू शिवाजी चौधरी आणि दत्तात्रय बाळाजी चौधरी हे दोघेजण दुचाकी क्रमांक एम एच २८, एक्यू ५३५० ने बिबी वरून काम आटोपून पिंपरी खंदारे येथे जात होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच १२, टिव्ही २०६७ या ट्रकने मोटारसायकल ला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार चिरडले गेल्याने त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती, पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.