दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या! दोघे ठार, दोघे गंभीर..! मलकापूर तालुक्यातील उमाळी - वरखेड रस्त्यावर झाला अपघात...

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव वेगातील दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. उमाळी ते वरखेड मार्गावर काल, शुक्रवारी सायंकाळी पाचता ही दुर्घटना घडली.

मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील अरुण राजाराम तडके (५५) व सुरजपालसिंग सुभाषसिंग राजपूत (३७) हे दोघे दुचाकी (क्रमांक एमएच-२८-एए-७६५२) ने दाताळ्याकडे जात होते. तर विना नंबरच्या पल्सर दुचाकीने सतरावर्षीय अर्जून मानसिंग राजपूत हा उमाळी येथून वरखेडकडे निघाला होता. दोन्ही दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अरुण तडके हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या दुचाकीवर बसलेले सुरजपालसिंह राजपूत गंभीर जखमी झाले.
दुसऱ्या दुचाकीवरील अर्जुन राजपूत हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती समजताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप काळे, एएसआय बाळू टाकरखेडे, पोहेकॉ गणेश सूर्यवंशी, सुभाष सरकटे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच सुरजपालसिंह राजपूत यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती केले. नातेवाइकांनी तोडले रुग्णालयाचे दरवाजे मृतक अर्जुनच्या संतप्त नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या गोंधळ घातला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात रुग्णालयाचे दोन्ही दरवाजे तोडले. तशी तक्रार शहर पोलिसांत देण्यात आली आहे...