

दोन मोटरसायकली धडकल्या! सोमठाण्याच्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू; दोन दिवसांपूर्वीच वडीलांची खून प्रकरणात झाली होती कारागृहात रवानगी...
Updated: Apr 29, 2025, 14:39 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन मोटरसायकली धडकून एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. आज,२९ एप्रिलला दुपारी साडेबाराच्या सुमारास चिखली शहरातील पुंडलिक नगरच्या कमानीजवळ हा अपघात झाला. पृथ्वीराज सुरडकर (२०, रा. सोमठाणा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मृतक पृथ्वीराज सुरडकर हा चिखली शहरातील एका दवाखान्यात कामाला होता. जेवणाचा डब्बा आणण्यासाठी तो जात होता. त्याचवेळी वळण घेतांना दुसऱ्या मोटारसायकशी त्याची धडक झाली. या अपघात त्याच्या डोक्याचा मागील बाजूस मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातस्थळी भाजप नेते दत्ता सुसर यांनी पोहोचून जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. आरटीओ पथकाच्या टीमने देखील वेळीच मदतकार्याला हातभार लावला. अपघातात मृत झालेल्या पृथ्वीराजचे वडिल खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.
मागील आठवड्यात सोमठाणा येथे एका दिव्यांग तरुणाचा खून झाला होता. त्या प्रकरणातील आरोपी म्हणून पृथ्वीराजच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या मृतक पृथ्वीराजचे वडील कारागृहात आहेत.